Thursday, April 17, 2025
Latest:
उद्योग विश्वकोकणखेडपश्चिम महाराष्ट्रपुणे जिल्हाप्रादेशिकरायगडविधायकविशेषसातारासामाजिक

एक हात मदतीचा : व्हायब्रण्ट एच आर प्रोफेशनल असोसिएशन पुणे मार्फत महाड आणि कोयना येथील पुरग्रस्तांना मदत

एक हात मदतीचा : व्हायब्रण्ट एच आर प्रोफेशनल असोसिएशन पुणे मार्फत महाड आणि कोयना येथील पुरग्रस्तांना मदत 

महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : सध्याच्या काळात महाराष्ट्रा मध्ये पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे महाड, कोयना, रायगड या ठिकाणी फार मोठे नुकसान झाले आहे. कित्येक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये सामाजिक बांधिलकीतून या पीडित कुटुंबाना मदत कार्य करण्यासाठी व्हायब्रण्ट एच आर प्रोफेशनल असोसिएशन पुढे सरसावली आणि महाड व महाड येथील गोठे, रावढल, जुई, राजावाडी या पुरामुळे नुकसान झालेल्या भागात १५० कुटुंबाना पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य, पाणी तर; कोयना येथील भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या आंबेघर, येरळा, सुतारवाडी, मोरणा या भागातील १५० पीडित कुटुंबाना पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य पाणी देण्यात आले. तसेच तेथील कोरोना विलगीकरण केंद्रात मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले.

याकामी महाड मॅन्युनफॅक्चरिंग असोसिएशन, एडीआर इंडिया, ए आर ए आय, सी एन एच, डेंसो, धूत बिल्डर्स, फ्रॅंक फेबेर, गृपो अँटोलीन, मास फ्लॅन्ज, पी आर एक्सिम, सेफ पॅक, श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साई फूड्स, टाटा ऑटोकॉम्प, के एस बी, एम एम ए चे जयदीप काळे व निखिल भोसले, पाटण पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी जगताप व विस्तार अधिकारी सूर्यकांत पवार, रोटरी क्लब पाटणचे अध्यक्ष सतीश रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते दीपक साळुंखे, विक्रम मोहोळकर, मोरणा शिक्षण मोरगिरीचे अध्यक्ष सुनील मोरे, प्रभारी प्राचार्य डी. एस. माथने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अजय रोपळेकर, आकाश पिंजण, अमेय गायकवाड, दिपक खोत, देवयानी देवकर, गणेश कनाप, नीता साळुंखे, कुणाल थोरात, महेश पाटील, मिलिंद आहेर, मोरेश्वरी पाटील, मृणालिनी सोनावणे, ऋषिकेश दमाने, संजय इप्पलापल्ली, संपत पारधी, सुधीर पाटील, केंद्र प्रमुख पवार, मोरणा शिक्षण संस्थेचे प्रभारी मुख्याध्यापक माथने सर, शीतल साळुंके, तेजसिंह देशमुख, करण पाटील, प्रसाद साळुंखे, सानिया साळुंखे, साईदर्शन घोडके, सुशांत लाडे, वरुण सिंग यांनी प्रयत्न केले. या सर्व कार्यक्रमाची नियोजन, सूत्र संचालन शंकर साळुंखे यांनी केले आणि सढळ हाताने मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानले.

● व्हायब्रण्ट एच आर प्रोफेशनल असोसिएशन पुणे हे औद्योगिक क्षेत्रामध्ये मानव संसाधन विभागामध्ये काम करणाऱ्या मानव संसाधन अधिकाऱ्यांची संघटना असून या संघटनेचे भारतभर ८२०० पेक्षा जास्त सदस्य आहेत. या संघटने मार्फत पर्यावरण सामाजिक समस्या आणि एच आर विषयी नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!