विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसेच विजया रहाटकर यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली होती, तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.