Saturday, August 30, 2025
Latest:
आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

विमानाचं तिकीट आठवड्याच्या ‘या’ दिवशी सकाळी बुक करायचं, स्वस्तात होतो प्रवास!

आयुष्यात एकदातरी विमानात बसावं, आपल्या आई-वडिलांना विमानातून जमीन कशी दिसते, आकाश कसं दिसतं ते दाखवावं, हे स्वप्न अनेकजणांनी उराशी बाळगलं असेल. काहीजण तर कुठेही जाण्यासाठी विमानाशिवाय दुसरं काही वापरतच नाहीत, काहीजण वर्षातून 2-2 ट्रिप विमानाने करतात. त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून, ते पैशांचं मॅनेजमेंट नेमकं करतात कसं, याबाबत आपण आश्चर्य व्यक्त करतो. तुम्हाला माहितीये का, सर्वच विमानांची तिकिटं महागडी नसतात. जरा डोकं लावून बुकिंग केलं तर कधीना कधी हे दर आपल्यालाही परवडू शकतात.

विमान तिकीट महागडं असतं यात काही दुमत नाही. परंतु त्यातल्या त्यात बचत होत असेल, तर ते कोणाला नाही आवडणार. म्हणूनच काही ट्रिक्स व्यवस्थित समजून घ्या. आठवड्यातून दोन दिवस विमान तिकिटं स्वस्त असतात. ते दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार. या दिवशी जवळपास 8 ते 15 टक्के कमी दराने विमान तिकीट मिळू शकतं. लक्षात घ्या, विमान तिकिटांचं बुकिंग हे कधीही सकाळी 6 वाजताच्या सुमारास करायचं, इतर वेळांच्या तुलनेत तेव्हा विमान तिकिटांचे दर परवडणारे असतात. तर, याउलट संध्याकाळी आणि रात्री विमानांचे तिकीट दर सर्वाधिक असतात.

कुठेही जायचं असेल तरी शक्यतो महिनाभर आधी विमानाचं तिकीट बुक करा. महिन्याच्या 28 तारखेला बुकिंग केलं तर उत्तम. त्यामुळे तुमची बचत होऊ शकते. कधीच शनिवारी किंवा रविवारी विमानाचं तिकीट बुक करू नका. शिवाय बुकिंग करताना फ्लेक्सिबल डेट निवडा. त्यामुळे तुम्हाला नंतर गरज असेल तर अधिकचे पैसे न देता प्रवासाची तारीख बदलता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!