Thursday, April 17, 2025
Latest:
पुणेपुणे जिल्हाप्रादेशिकभोरमहाराष्ट्रविशेष

विजेच्या धक्क्याने बाप लेकासह चार शेतकऱ्यांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

विजेच्या धक्क्याने बाप लेकासह चार शेतकऱ्यांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

महाबुलेटीन न्यूज l संतोष म्हस्के

भोर : पुणेसातारा महामार्गावरील निगडे ता. भोर येथे विजेचा शॉक लागून मुलगा वडिलांसह चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचीघटना गुरुवार दि. १५ घडली. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे निगडे गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

गुंजवणी नदी पात्रातील पाण्याच्या बंधाऱ्यांमध्ये मोटर बसवण्यासाठी गेले असताना अचानक वीज सुरू झाल्याने पाण्यात वीज प्रवाहउतरून विठ्ठल सुदाम मालुसरे ( वय४५ ), सनी विठ्ठल मालुसरे ( वय२६ ), आनंद ज्ञानेश्वर जाधव ( वय५५ ) अमोल चंद्रकांतमालुसरे ( वय३६, सर्व रा. निगडे, ता.भोर, जि. पुणे ) या चौघांना पाण्यात विजेचा धक्का बसून चौघांचा जागीच मृत्यू झाला.

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे या चार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. चारहीमृतदेह पाण्यातून बाहेर काढले असून चौघेही एकाच गावातील असल्याने निगडे गावावर शोककळा पसरली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!