Saturday, August 30, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविशेषशैक्षणिक

चाकणचे उद्योजक विजय खरमाटे यांना ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीची ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्रदान

 

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण : ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीने चाकण नगरीचे उद्योजक श्री. विजय खरमाटे यांना खासदार अमोल कोल्हे व खेड तालुक्याचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे शुभहस्ते ‘मानद डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान करण्यात आली.

खरमाटे हे गेली 10 वर्षे राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेचे ‘राष्ट्रीय उपाध्यक्ष’ असून संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात ते सक्रिय सहभाग घेतात. केंद्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली या संस्थेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी पेलत आहेत.

याप्रसंगी चाकण नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष श्री. ऋषिकेशशेठ झगडे, विरोधी पक्षनेते श्री. जीवनशेठ सोनवणे, उद्योगपती श्री. राजुशेठ मोहिते पाटील, उद्योजक सागरशेठ बनकर, माजी उपसरपंच मनोजशेठ खांडेभराड, युवा नेते श्री. मयूरशेठ वाडेकर, श्री. सतिषशेठ मंडलिक, श्री. बब्बूभाई शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!