पुणे जिल्हा भाजपच्या वतीने २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व विज ग्राहकांच्या मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन
पुणे जिल्हा भाजपच्या वतीने २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व विज ग्राहकांच्या मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन
महाबुलेटीन न्यूज
पुणे : पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११. वाजता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व विज ग्राहकांच्या मागण्या मान्य न केल्यास जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली.
सर्वसामान्य माणसाला विजबिलाचा शॉक दिल्याने विज ग्राहकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यात महाराष्ट्र राज्यव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.
■ वीज ग्राहकांच्या मागण्या :-
● आवाजावी बिल दुरूस्त करून द्या
● १०० युनिट पर्यंत वीज मोफत द्या
● वीज पुरवठा सुरळीत चालू करावा,
● घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या २५ हजार रू द्या.
आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.