Saturday, August 30, 2025
Latest:
गुन्हेगारीजुन्नरपुणे जिल्हाविशेष

वेश्या व्यवसाय चालवत असलेल्या सह्याद्री लॉजवर पोलिसांची कारवाई

 

उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी टाकला छापा

महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या जुन्नर तालुक्यातील कारखाना फाटा येथील एका लॉजवर नारायणगाव पोलिसांनी कारवाई करून लॉजचा मॅनेजर प्रवीण राम जाधव याला अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.


धनगरवाडी, कारखाना फाटा येथील सह्याद्री लॉजवर वेश्या व्यवसाय चालु असल्याबाबत नारायणगाव पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांना सह्याद्री लॉज वर वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत माहिती दिली.

त्यानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सह्याद्री लॉज वर बनावट गिऱ्हाईक, पोलीस व पंच यांना मार्गदर्शन करून छापा कारवाई साठी पाठवले. त्यानुसार सह्याद्री लॉजवर बनावट ग्राहक बनून गेलेल्या इसमाने वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली त्याप्रमाणे सह्याद्री लॉजचे मॅनेजर प्रवीण राम जाधव यांनी वेश्यागमनासाठी महिला पुरवून बनावट गिराईकाकडून एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली. याच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी शिताफीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या पीडित महिलेला व लॉजचा मॅनेजर प्रवीण जाधव यांना छापा टाकून ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपी प्रवीण राम जाधव याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिलीआहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के व नारायणगाव पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!