Saturday, August 30, 2025
Latest:
जुन्नरपुणे जिल्हाविधायकविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कारसामाजिक

वक्फ मिळकतीचा वापर समाज उन्नतीसाठी करा : ॲड. अहमदखान पठाण

 

नारायणगाव येथे भारतरत्न मौलाना अबूल कलाम यांची जयंती साजरी
शैक्षणिक संस्था, शिक्षक यांना पुरस्कार, विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्तीचे वाटप

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
नारायणगाव (किरण वाजगे) : “मुस्लिम समाजातील सर्व वक्फ मिळकतीचे सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्या मिळकती स्थानिक वक्फसंस्था विकसनासाठी वापरून शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक विकासासाठी वक्फ मिळकती उपयोगात आणाव्यात. दुर्दैवाने इनामी जागांवर अतिक्रमण, बेकायदेशीर हस्तांतरण, विक्री आणि करार घडवून आणले जातात. शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे,” असे मनोगत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे माजी सदस्य ॲड. अहमदखान पठाण यांनी व्यक्त केले.

संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था राजुरी, अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी असोसिएशन जुन्नर विभाग, ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त जुन्नर तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, व्यक्तींना शैक्षणिक पुरस्कार वितरण आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ तसेच शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ॲड. अहमदखान पठाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी पूना कॉलेज पुणेचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, व्याख्याते डॉ. मिलिंद कसबे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सरपंच योगेश पाटे, संकल्प संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलाम नबी शेख, नगरसेवक फिरोज पठाण, जमीर कागदी, मुंबई महानगरपालिकेचे उर्दू शाळा निरीक्षक मेहबूब खान, उर्दू शाळा पालक संघाचे सचिव अकबर बेग, आयशा बेगम उर्दू हायस्कूल, शिरूरचे अध्यक्ष हुसेन पटेल, जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समितीचे अध्यक्ष सादिक आत्तार, हाजी अब्दुला महालदार पतसंस्थेचे अध्यक्ष मुबारक तांबोळी, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळेचे विश्वस्त रोहिदास पाडेकर, प्राचार्य संजय वाघचौरे, आदिवासी विकास प्रकल्पाचे सदस्य रोहिदास भोंडवे, माजी उपसरपंच रईस मन्यार, आरिफ आतार, राजुरी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जाकीर पटेल, आळेफाटा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मुजाहिद जमादार, सहकार शिक्षण अधिकारी हुसेन तांबोळी, डॉ. रसूल जमादार, तौसिफ़ कुरेशी, रेहान कुरेशी, डॉ. समीर इनामदार, ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेर आतार, दानिश इनामदार, संकल्प संस्थेचे अध्यक्ष कलीम पटेल, जिलानी पटेल, हारून पटेल, मोसिन जमादार, मार्गदर्शक मेहबूब काझी, मोबीन शेख, अशपाक पटेल, युसूफ आतार, शकील इनामदार, शौकत पटेल, रियाजत पठाण व जुन्नर तालुक्यातील विविध गावातील मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजातील सर्व प्रमुख व्यक्तींनी एकत्र येऊन आदर्श शैक्षणिक संकुल उभे करावे. त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करणे कामी महाराष्ट्र शासनाच्या वक्फ बोर्डाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही ॲड. अहमदखान पठाण यांनी सांगितले. भारतीय समाजव्यवस्थेतील विषमता नष्ट करण्यासाठी आणि सर्व समाजाचा विकास होणे कामी भारतीय राज्यघटनेने समान संधी दिली आहे, परंतु दुर्दैवाने आजही दलित, अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या संधी पासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे, अशी खंत प्रमुख व्याख्याते डॉ. मिलिंद कसबे यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक समाजातील मुला मुलींना उच्च शिक्षणामध्ये संधी देण्यासाठी अंजुमन खैरुल इस्लाम ट्रस्ट मुंबईचे पूना कॉलेज यांच्या माध्यमातून व्यवसाय मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विविध आधुनिक शिक्षण मिळणे कामी संकल्प संस्थेसोबत सातत्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी आणि कार्यवाही केली जाईल, असे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक फिरोज पठाण,जमीर कागदी, हुसेन पटेल, फैजा शेख, नकिब शेख, आर्शिया पठाण यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमांतर्गत संकल्प संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ‘उम्मत की खिदमत’ या शैक्षणिक शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना उच्चशिक्षणासाठी ७२ हजार रुपयांची शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, युनायटेड इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर, जिल्हा परिषद उर्दू शाळा ओतूर, आयशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर, रेश्मा चौगुले राजुरी, डॉ. नादिया तलफदार यांना भारतरत्न मौलाना आझाद पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत विशेष गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी गुलाम नबी शेख यांनी केले व सूत्रसंचालन मेहबूब काझी व अशफाक पटेल यांनी केले. तर मोबीन शेख यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!