१४ हजार रुपये अगोदर द्या, मगच मृतदेह दिला जाईल, मृतदेह घ्यायला उशीर केल्यास आणखी ५ हजार : रुग्णालयाचा अजब कारभार….
१४ हजार रुपये अगोदर द्या, मगच मृतदेह दिला जाईल, मृतदेह घ्यायला उशीर केल्यास आणखी ५ हजार : रुग्णालयाचा अजब कारभार…
सहा तास मायमर हॉस्पिटलच्या आवारात उपचाराविना चक्कर येऊन पडलेल्या महिलेचा अखेर दुर्दैवी मृत्यू…
मायमर मेडिकल हॉस्पिटल राज्य शासनाने ताब्यात घ्यावे :
किशोर आवारे..
महाबुलेटीन न्यूज : मिलिंद अच्युत
तळेगाव दाभाडे : सहा तास मायमर हॉस्पिटलच्या आवारात उपचाराविना चक्कर येऊन पडलेल्या महिलेचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत ज्येष्ठ महिलेचे नाव शेलाबाई पांडुरंग कलवडे ( वय ६५, रा. निगडे ता. मावळ ) असे आहे.
शेलाबाई कलवडे यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी काही तासातच रेशनकार्ड त्या महिलेला बनवून दिले. स्वतः निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी या महिलेचा उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्याचे सांगितले असताना त्या महिलेच्या नातेवाईकांकडे ७ हजार ५०० रुपयांची ओषधे तसेच मंगळवारी त्या महिलेचा मृत्यू झाल्यावर १४ हजार रुपये अगोदर द्या, मगच मृतदेह दिला जाईल व मृतदेह घेण्यास उशीर केल्यावर आणखी ५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
डिपॉझिट भरायला पैसे नसल्याने व कागदपात्रांची पूर्तता नसल्याने मायमर हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिल्याने जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सदर वृद्ध महिलेला तहसिलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्य समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांच्या मध्यस्थीने उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. मायमर मेडिकलने रेमडिवीर लसींचा काळा बाजार केल्याचे उघडकीस आले होते.
सदर महिलेचा मृत्य झाल्यानंतर जनसेवा विकास समितीच्या वतीने मायमर हॉस्पिटलच्या आवारात आंदोलन करण्यात आले व घोषणाबाजी करण्यात आली. सहा तास चाललेल्या आंदोलनादरम्यान मृताच्या नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला. या वेळी मोठया प्रमाणात पोलीस फाटा उपस्थित होता.
मावळचे निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे व जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी जेष्ठ महिलेला आर्थिक परिस्थिती हलाकीचे असल्याने तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि.११) वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.मात्र या जेष्ठ महिलेला योग्य औषधोपचार न मिळाल्याने तिचा मंगळवारी (दि.१३) मृत्यु झाला. तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची पिळवणूक होत असल्याबाबत जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी आंदोलन केले.
याप्रसंगी मावळचे निवासी नायब तहसीलदार रावसाहेव चाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
अशा घटना वारंवार या हॉस्पिटलमध्ये घडत असल्याने
जनसेवा विकास समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे मंगळवारी (दि.१३) ४० रुग्णांना औषधोपचार मिळाल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
तळेगाव जनरल हॉस्पिटल मावळ तालुक्यात सर्वाधिक बेड, व्हेंटिलेटर बेड असलेले हॉस्पिटल असुन रुग्णांना रेमडीसिविर औषध तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ न देता रुग्णांकडून पैसे उकळले जात आहेत. या हॉस्पिटलच्या प्रशासन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलण्याची भाषा योग्य नाही. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना वारंवार औषधे आणण्यासाठी यादी दिली जाते. रुग्णाला बोलण्यासाठी संपर्क करुन दिला जात नाही. १६ व्हेंटिलेटर असताना रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मावळ तालुक्यातील गरीब गरजू रुग्णांना औषधोपचार मिळत नसुन इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. मावळ तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये शिल्लक बेड, रुग्ण संख्या व औषधोपचार आदी माहिती प्रथम दर्शनी लावण्याची मागणी जनसेवा विकास समितीने केली आहे. तसेच मावळ तालुक्यातील ५० टक्के रुगांना बेड उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, नगरसेवक संतोष शिंदे, नगरसेवक रोहित लांघे, नगरसेवक निखिल भगत, प्रवक्ता मिलिंद अच्युत, सुनील पवार, कल्पेश भगत, अनिल पवार, संविद पाटील, अनिल कारके, चंदन कारके व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.