युनिकेअर हॉस्पिटल समोरील खड्डा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजविला

महाबुलेटीन नेटवर्क / कल्पेश भोई
चाकण : चाकण तळेगांव रस्त्यावरील युनिकेयर हॉस्पिटल समोर असणारा व अपघाताला आमंत्रण देणारा खड्डा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने मुरूम टाकून बुजवला. याबाबतची अधिक माहिती अशी की, गेली कित्येक महिने चाकण-तळेगांव रस्त्यावर असणारा खड्डा बुजविण्या साठी नाणेकरवाडी व परिसरातील नागरीकांनी संबंधित विभागाकडे वारंवार मागणी केली; मात्र ढिम्म प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम रोज किरकोळ अपघात मध्ये होत होता. याबाबत राष्ट्रवादीचे तालुका उपाध्याक्ष कुशल जाधव, नितिन नाणेकर, नवनाथ नाणेकर, नवथान शेडगे, विशाल जाचक, गोरक्ष शेलार, बबलू नाणेकर, उपमंनु तासकर आदींनी मुरूम टाकून सदर खड्डा बुजविला आहे.