उद्योजक व माजी सरपंच दयानंद येळवंडे यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : निघोजे ( ता. खेड ) गावचे उद्योजक व माजी सरपंच दयानंद आनंदराव येळवंडे ( वय ४८ ) यांचे आज ( दि. ११ ) सकाळी ९ वाजता लवळे येथील सिम्बॉसिस रुग्णालयात उपचार चालू असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, २ मुली, सून, जावई, चुलते, पुतणे असा परिवार आहे. आदर्श सरपंच आनंदराव येळवंडे यांचे ते चिरंजीव होत.