Thursday, August 28, 2025
Latest:
अपघातनागरी समस्यापुणे जिल्हाविशेषशिरूर

स्विफ्ट कार गेली ओढ्यातील पाण्यात…

…अन्यथा बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांना व ठेकेदाराला शिवसेना स्टाईलने काळे फासणार : शिवसेना
मलठण – शिरूर रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्याने होतायेत अपघात, ठेकेदार व आधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरीकांची मागणी

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिरूर ( दि. ०८ सप्टेंबर ) : मलठण -शिरूर रस्त्यावरील ओढयावरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रलंबित आहे. सध्या ओढयाला पाणी असल्यामुळे व रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या पुलावरुन प्रवास करणारी स्वीप्ट कार घसरून पाण्यात पडली. तरीही अद्याप ठेकेदार व आधिकाऱ्यांना जाग आली नाही.

प्रसगांवधान दाखवून इतर लोकांनी मदत केल्यामुळे गाडीतील युवकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जीवीतहानी टळली. सदर पुलाच्या कामाच्या ठिकाणी खोदकाम करून ठेवल्यामुळे गाडया घसरून वारंवार अपघात होत आहेत. घटनास्थळी यापुर्वी अपघात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रखडलेल्या रस्त्याच्या या पुलाचे काम ठेकेदाराने त्वरित पुर्ण करण्याची मागणी मलठणचे सरपंच प्रकाश गायकवाड, किरण देशमुख, दत्ता गडदरे यांनी केली आहे.

शिरूर-मलठण मार्गे खेड, मंचर, नारायणगाव, भिमाशंकर, नाशिक येथे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर कायम वर्दळ असते, त्यामुळे या रस्त्यावरील पुलाचे रखडलेले काम लवकर व्हावे, अन्यथा बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांना व ठेकेदाराला शिवसेना स्टाईलने काळे फासले जाईल, अशा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी दिला आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!