Thursday, April 17, 2025
Latest:
कोकणप्रादेशिकमीडियामुंबईविशेष

ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा! डिजिटल मिडिया संघटनेच्या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश

ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा!
डिजिटल मिडिया संघटनेच्या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश

महाबुलेटीन न्यूज । किशोर कराळे 
मुंबई, दि. ०९ सप्टेंबर : महापूर,अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यासह कोकणातील सर्व जिल्ह्यात पत्रकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या संदर्भात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजा माने, ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले आणि राज्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत व पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. या मागणी संदर्भात मुख्यम़त्री कार्यालयाने कोकण विभागीय आयुक्तांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे, सचिव नंदकुमार सुतार, राज्य उपाध्यक्ष किशोर मरकड, सहसचिव केतन महामुनी, कोकण विभागाचे अध्यक्ष सागर चव्हाण, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी सुरवसे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, विदर्भाचे अध्यक्ष विनोद देशमुख व कार्याध्यक्ष नरेंद्र वैरागडे, मराठवाडा अध्यक्ष डॉ.रेखा शेळके, संघटनेचे सल्लागार मार्गदर्शक अरुण खोरे, डॉ.सतीश पावडे, जयु भाटकर आणि राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश वांदिले, मोहन राठोड, पद्माकर कुलकर्णी, दिपक नलावडे, प्रमोद मोरे, संतोष सूर्यवंशी, अशोक गोडगे, सविता कुलकर्णी तसेच मुंबई अध्यक्ष संजय भैरे, शंकर जाधव, सतीश सावंत, डॉ.सुनिल पाटील, दिलीप माने, संतोष मानूरकर, देव शेजूळ, नितीन पाटील, सुनिल उंबरे, शामल खैरनार, अविनाश चिलेकर, महेश कुगांवकर, प्रशांत चुयेकर, सुहास पाटील, प्रा.सतीश मातने, तृप्ती डिग्गीकर, विजय पवार, विनोद ननावरे, विजय कोरे, डॉ. तुषार देशमुख, संदीप कुलकर्णी, टिंकू ऊर्फ अजय पाटील, कुंदन हुलवाले आदी पदाधिकाऱ्यांनी सर्व पातळ्यांवर पाठपुरावा केला. या संदर्भात कोकणातील जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत.

राज्यातील सर्व न्यूज पोर्टल्स, यूट्यूब चॅनल्स आणि सर्वच डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील न्यूज नेटवर्कला शासकीय जाहिराती सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील तसेच माहिती राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने यापूर्वीच केलेली आहे. त्याही मागणीचा पाठपुरावा सुरु आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!