Sunday, August 31, 2025
Latest:
आंबेगावखेडगुन्हेगारीपुणे जिल्हाविशेष

तरुणाच्या खून प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून 24 वर्षे तरुणाचा खून करून त्याला खेड घाटात टाकून त्याच्या अपघाताचा बनाव करणाऱ्या चार आरोपींना खेड पोलिसांनी दोन तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मयुर एरंडे ( वय २४ रा. थुगाव, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे ) याचा आरोपी आदित्य बबन नवले (रा. शिवाजी चौक, देवकी प्लाझा, मंचर ) गणेश भास्कर वाबळे ( रा. संभाजी चौक, मांगवाडा, मंचर ) साहिल अंबादास सुरवसे ( रा.निघोटवाडी, ता. आंबेगाव, पुणे ) सोन्या उर्फ आनंद सुधीर नाटे (रा. मंचर, ता.आंबेगाव, जि. पुणे ) यांचे बरोबर मंचर गावच्या हद्दीत असलेल्या बुवासाहेब मंदिराच्या टेकडीवर दारू पिताना शाब्दिक बाचाबाची झाली होती. यामध्ये मयुर याने आरोपी आदित्य बबन नवले यांच्या कानाखाली मारल्याच्या कारणावरून त्यांनी तू कानाखाली का मारली ? असे म्हणून त्याला लाकडी दांड्याने व लोखंडी खोऱ्याने डोक्यात गंभीर मारहाण करून त्याचा खून केला.

हा अपघात आहे, असे भासविण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी मयत मयूर याला चारचाकी गाडीत घालून व त्याची मोटरसायकल घेऊन खेड पोलीस ठाणे हद्दीतील खेड घाटात त्याची मोटर सायकल व मयतास पुणे-नाशिक हायवे वरील घाटात वळणावर उताराच्या बाजूला टाकून दिले.

सदर घटनेची माहिती खेड पोलिसांना मिळतात खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते व खेड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या पथकाने तपासास सुरुवात करून दोन तासाच्या आत गुन्ह्याचा उलगडा करून गुन्ह्यातील चार आरोपींना तात्काळ अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नवनाथ थिटे, शंकर भवारी, पोलीस नाईक सुदाम घोडे, पोलीस कॉन्स्टेबल शेखर भोईर, निखिल गिरीगोसावी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वडेकर यांनी या तपासकामी महत्त्वाची मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!