Wednesday, October 15, 2025
Latest:
कोरोनाखेडविशेष

….तर गंभीर परिणाम होतील-आमदार दिलीप मेहिते पाटील

तालुक्यात १३ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाउन तर राजगुरूनगर, चाकण व आळंदी या तीन नगरपरिषदा आणि १८ गावे १४ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्रे घोषित
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कारभार सुधारला नाही तर गंभीर परिणाम होतील, असा सज्जड दम खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राजगुरूनगर येथील आजच्या (११जुलै) बैठकीत भरला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या, असे मोहिते पाटलांनी खडसावले.
          खेडमध्ये कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी  आज आमदार दिलीप मोहिते आणि प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक राजगुरूनगर येथे झाली. या बैठकीत काही महत्वपूर्ण  निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये तालुक्यात १३ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तसेच, राजगुरूनगर, चाकण व आळंदी या तीन नगरपरिषदा आणि १८ गावे १४ दिवसांसाठी, प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. चांडोली, चाकण आणि आळंदी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चांडोली ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच आळंदी, चाकणच्या केंद्रात सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले.
        दरम्यान, या लॉकडाउनमध्ये कंपन्या बंद राहणार नाहीत. कामगारांना पास देण्यात येतील. किराणा, भाजीपाला, दवाखाने, औषध दुकाने आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, तसेच आमदार दिलीप मोहिते यांनी उपलब्ध करून दिलेल्या १० लाख रुपयांच्या निधीतून, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट आणि रुग्णांवर उपचार करताना वापरावयाच्या साहित्याचे वितरण यावेळी करण्यात आले.
ही गावे कंटेंनमेंट झोन – कडूस, पाईट, येलवाडी, निघोजे, दावडी, सोळू, मरकळ, काळूस, मेदनकरवाडी, खराबवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी, सातकरस्थळ, पिंपरी बुद्रुक, वाकी खुर्द, शेलपिंपळगाव, चिंबळी, मोई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!