Saturday, August 30, 2025
Latest:
जुन्नरपुणे जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रविशेष

महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाच्या वतीने तमाशा पंढरीत उपोषण

 

स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या पुतळ्यासमोर रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली साखळी उपोषण

महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊन मुळे तसेच तमाशा कला सादर करण्यासाठी शासनाची परवानगी नसल्यामुळे हवालदिल झालेल्या तमाशा फडमालक व कलावंतांचे जिने मुश्कील झाले आहे. याच कारणामुळे सर्व तमाशा कलावंतांना शासनाची मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाचे पदाधिकारी नारायणगाव येथील स्वर्गीय विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ तमाशा फडमालक व या संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिली.

गेली सहा महिने शासनाने कलावंतांना भरीव अशी मदत केली नाही, या कारणामुळे राज्यात आपली तमाशा कला सादर करणाऱ्या सुमारे पंचेचाळीस हजार कलावंतांची उपासमार झाली आहे. कलावंतांना मदत मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा, पत्रव्यवहार केला तरीही शासनाने दखल न घेतल्यामुळे दि. २१ सप्टेंबर पासून नारायणगाव येथे साखळी उपोषण करणार असल्याचे रघुवीर खेडकर यांनी सांगितले.

या उपोषणाला विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मालती इनामदार नारायणगावकर, विठाबाई यांचे पुत्र कैलास व राजेश नारायणगावकर, संघटनेचे सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल, विशाल नारायणगावकर, शांताबाई संक्रापूरकर, शाहीर संक्रापूरकर, संजय महाडिक, संगीता महाडिक, विनायक महाडिक, मिथुन लोंढे, महेश बांगर आदी पदाधिकारी या उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!