तळवडे वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीकरीता समविषम तारखेस पार्किंग व नो पार्किंग झोन निर्बंध
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता तळवडे वाहतुक विभागांतर्गत पिंपरी चिंचवड शहर अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा. फायरबिग्रेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) वगळता देहूगाव मुख्य कमान ते आंबेडकर चौक येथे समविषम तारखेस पार्किंग या ठिकाणी सम-विषम तारखेस पार्किंगचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच आंबेडकर चौक ते मुख्यमंदिर व तालिम ते शिवाजी चौक येथील रस्त्यावर नो पार्किंग झोन अशा प्रकारचे निर्बंध घालण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड वाहतुक शाखेचे पोलीस उपाआयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.