तडीपार गुंडाचा पिस्तूलातून फायरिंग करीत धारदार शस्त्र व दगडाने ठेचून निर्घृण खून
तडीपार गुंडाचा पिस्तूलातून फायरिंग करीत धारदार शस्त्र व दगडाने ठेचून निर्घृण खून
महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
राजगुरूनगर : विविध गुन्ह्यात सहभाग असलेला तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पु कल्याण वाडेकर ( वय २८ ) याचा पिस्तूलातून फायरिंग करत नंतर पाठलाग करून धारधार शस्त्र व दगडाने ठेचून निघृन खुन करण्यात आल्याची घटना पाबळरोड चव्हाण मळा येथे आज (दि.१२) मध्यरात्री घडली. तडीपार गुंडाच्या हत्येने पुणे जिल्हयात खळबळ उडाली आहे. जुन्या गुन्हेगारीच्या रागातुन हा खुनी हल्ला झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला असून मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी हा खून केल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी वर्तवला आहे.
पप्पु वाडेकर याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे ९ गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात नोंद आहे. पोलिसांनी त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिण्यासाठी तडीपार केले होते. रविवारी (दि ११) रात्री तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यास राजगुरूनगर येथे आला होता. रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्याला राजगुरूनगर पाबळ येथील खेड कनेरसर मार्गावर पाबळ रोड परिसरात त्याला आरोपींनी गाठले. त्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर दोन इमारतीच्या मध्यभागी शेतात एका झाडाखाली वाडेकर याचा दगडाने ठेचुन खुन केला.
घटनास्थळी जिल्हा ग्रामिण अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली.
००००