Friday, April 18, 2025
Latest:
गुन्हेगारीदौंडपुणे जिल्हाराजकीयविशेष

सुनेचा विनयभंग करणाऱ्या राजकीय नेत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
यवत : सुनेचा विनयभंग करणाऱ्या राजकीय नेत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वरवंड येथील एका राजकीय नेत्यावर सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्यावर व कुटुंबातील इतरांवर यवत पोलिसांनी सोमवारी ( दि ५ ) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अत्याचार, विनयभंग करत माहेरी असलेली मालमत्ता मिळवण्यासाठी दमदाटी करत जीवे माराण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर आरोपींना लवकरच अटक होवुन जामिनही झाला, मात्र राजकीय दबावामुळे यातील आरोपींवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष योगिनी दिवेकर यांनी यवत पोलिसांना निवेदन देत याप्रकरणी योग्य तपास करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात हाथरस ( यूपी) घटनेचा उल्लेख करत त्या भगिनीच्या कहाणीने संपुर्ण देशात हळहळ होत आहे. त्याचेच महाराष्ट्रात पडसाद उमटु नयेत, म्हणून सदर नेत्याच्या कृत्यास विरोध करताना हाथरस मधील भगिनीला मनःपुर्वक अभिवादन असे म्हटले आहे.

पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्षा वैशाली नागवडे, दौंड तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा योगिनी दिवेकर, ओ.बी.सी सेल-दौंड तालुका महिला अध्यक्षा ज्योती झुरंगे, दौंड तालुका युवती उपाध्यक्षा गौरी दिवेकर, सरचिटणीस सरिता दिवेकर यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!