सुजान कॉन्टिटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून डेहणे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास ११ लाखाचा धनादेश
महाबुलेटीन न्यूज
चाकण : चाकण एमआयडीसीतील सुजान कॉन्टिटेक एव्हीस प्रा. लि. या कंपनीच्या वतीने सीएसआर फंडातून डेहणे ( ता. खेड ) येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास संगणक प्रयोगशाळा, शालेय साहित्य व इमारत दुरुस्तीसाठी ११ लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सुजान, मुख्य वित्त अधिकारी सुशील पंडीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सी. यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे सरव्यवस्थापक हनुमंत खेंगरे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात आला. यावेळी रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पवार, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मुळूक, अनिकेत खालकर आदी उपस्थित होते.
—–