महाबुलेटीन विशेष : सृष्टी जगतापच्या लावणी नृत्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद… सलग 24 तास लावणी सादर करण्याचा विक्रम…
लातूरच्या कन्येचा अनोखा विक्रम…रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले…
महाबुलेटीन न्यूज : लातूर जिल्ह्यातील गंगापुरची कन्या सृष्टी जगताप या विद्यार्थिनीने लातूरकर रसिकांना अभिमान वाटावा, असे यश मिळवले आहे. सलग 24 तास नृत्यप्रधान लावणी मोठ्या खुबीने सादर करणे सोपे नसतानाही हे आव्हान तिने स्वीकारले आणि त्यात उल्लेखनीय यशही मिळवले. तिच्या या विक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने श्रुष्टी व तिच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला.