श्री.एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन व विद्याव्हँली शाळेत स्वातंत्र्यदिन ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून उत्साहात साजरा
श्री.एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन व विद्याव्हँली शाळेत स्वातंत्र्यदिन ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून उत्साहात साजरा
महाबुलेटीन न्यूज
चाकण : भारतीय स्वातंत्र्याच्या अमत महोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री.एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या चाकण व राक्षेवाडी शैक्षणिक संकुलात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून स्वातंत्र्यदिन ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील शिक्षिका सौ. साक्षी कुरलेकर व सौ. मीनल चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्कृत शिक्षिका हषदा जोशी यांनी देशभक्ती पर सुंदर गीत सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रणदिवे यांनी ऑनलाइन विद्यार्थी व पालक यांच्या समोर आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. शामराव देशमुख यांनी आपल्या मनोगतात शाळेने वेगवेगळ्या ऑनलाइन शिबीरातून मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थी ऑनलाइन प्रणाली मुळे जगाशी जोडले गेले व नाविन्यपूर्ण गोष्टी शिकत आहेत याबद्दल कुतूहल व्यक्त केले व यापुढे हि असेच उपक्रम घेण्यात यावे व विद्यार्थी च्या कला व गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांनी यापुढे ही वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. साहेबराव देशमुख, श्री. शामराव देशमुख, सौ. रोहिणी देशमुख, सौ. सुमनताई देशमुख, श्री. डी. पी. सोनवणे, सर्व शिक्षक वर्ग, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेतील विद्यार्थी व पालक ऑनलाईन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ. स्वाती रणदिवे व दिपक शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. के. गायकवाड व सौ. वंदना सरनाईक यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार सौ. विद्या सपाटे यांनी केले.
००००