श्री. एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन व विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल, चाकण प्रशालेत वृक्षारोपण व वर्धापन दिन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शांततेत साजरा
श्री. एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन व विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल, चाकण प्रशालेत वृक्षारोपण व वर्धापन दिन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शांततेत साजरा
महाबुलेटीन न्यूज
चाकण : श्री. एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन व विद्याव्हँली इटरनँशनल स्कूल, चाकण प्रशालेत वृक्षारोपण व १७ वा वर्धापन दिन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शांततेत साजरा करण्यात आला.
कोवीड १९ या विषाणू प्रादुर्भावामुळे सर्व जगावर न भुतो न भविष्यती असे संकट ओढवले असताना विद्यालयाने विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाळेतील विद्यार्थ्यांना ‘वेबेक्स अँप’ च्या माध्यमातून १७ वा वर्धापन व वृक्षारोपण दिन कार्यक्रम आपल्या घरून तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्यक्ष अनुभवता आला. अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. शामराव देशमुख यांनी शिक्षकांना संबोधित करताना संस्थेने खडतर प्रवास करत १७ वर्षाची वाटचाल यशस्वी केली. तसेच पर्यावरणाचे रक्षण व महत्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी प्रशालेत १७ व्या वर्धापनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. सर्व विद्यार्थी या उपक्रमात ऑनलाईन उपस्थित होते.
कोणत्याही शैक्षणिक संकुलांचे महत्वाचे चार स्तंभ असतात ते म्हणजे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक पंरतू या जागतिक महामारी मुळे सध्या सर्व गोष्टी पुर्णपणे बंद आहेत. तरी देखील पालक व विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऑनलाईन शिक्षण प्रभावी पणे यशस्वी रित्या घेतल्या बद्दल शिक्षकांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना कोवीड १९ मध्ये सुध्दा ऑनलाईन शिक्षण नाविन्यपूर्ण व दर्जेदार रित्या कसे देता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम शासनाने नेमुन दिलेल्या सोशल डिस्टनसिंगच्या नियमानुसार पार पडला. सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक श्री. साहेबराव देशमुख, खजिनदार सौ. सुमनताई देशमुख, सचिव सौ. रोहिणीताई देशमुख, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
०००००