श्री.क्षेत्र महाळुंगे येथील स्मशानभुमीच्या संरक्षक भिंतीचा भूमिपुजन समारंभ संपन्न
श्री.क्षेत्र महाळुंगे येथील स्मशानभुमीच्या संरक्षक भिंतीचा भूमिपुजन समारंभ संपन्न
महाबुलेटीन न्यूज । संदेश जाधव
महाळुंगे इंगळे : श्री. क्षेत्र महाळुंगे (इंगळे) ता. खेड येथील स्मशानभुमीच्या संरक्षक भिंतीचा भूमिपुजन समारंभ संपन्न झाला.
वैकुंठधाम स्मशानभूमी मधील तळ्याकाठची संरक्षक भिंत ढासळलेली होती. स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचतीकडे पाठपुरावा केला असता ग्रामपंचायतने तत्काळ कार्यवाही करत ग्रामपंचायत फंडातून नवीन संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला. विद्यमान सरपंच मयुरी प्रताप महाळुंगकर पाटील यांच्या शुभहस्ते व विद्यमान उपसरपंच ऋषीकेश मिंडे, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पारासुर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूमिपुजन समारंभ संपन्न झाला.
यावेळी मा. उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ महाळुंगकर पाटील, लक्ष्मण महाळुंगकर पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेखर तुपे, किशोर भालेराव, नितीन फलके, मनोज इंगवले, पांडुरंग काळे, ग्रामपंचायत सदस्या मंगल भोसले, अर्चना महाळुंगकर पाटील, वैशाली महाळुंगकर पाटील, जयश्री वाळके, वैशाली जावळे, दिपाली भोसले, पल्लवी भालेराव, बेबी मेंगळे आदी यावेळी उपस्थित होते.
अनेक दिवस प्रलंबित असलेले काम मार्गी लागणार असल्याने व ग्रामपंचायतने तत्काळ घेतलेल्या निर्णयाचे स्थानिक ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतचे कौतुक केले जात आहे.
००००