Wednesday, April 16, 2025
Latest:
खेडशैक्षणिक

श्री समर्थ ची इयत्ता 12 वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग भरारी…!

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : श्री समर्थ ज्युनियर कॉलेज व श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 97% लागला आहे.
सर्वे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून कॉलेजचे नाव उज्वल केले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्याताई गवारे, संभाजीशेठ गवारे, चिंबळी फाटा शाखेच्या प्राचार्या अनिता टिळेकर,  प्राचार्य विष्णू भद्रे, खराबवाडी शाखेचे प्राचार्य राम मुदगुले, विद्या पवार, प्रा. सुशील कालेकर या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. कॉलेजचे सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकरिता सतत नेहमी प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करणारे नवनाथ कोळेकर, खुशाल ओसवाल, अंकिता बोरकर, जागृती येवले, अविनाश कड, पुजा पवार, स्वप्नाली मॅडम तसेच संदिप पवार, अश्विनी देवकर, राणी पाटील, चिंबळी फाटा येथील जीवन साळवे, डोंगरे नीलिमा, लगड तेजश्री, मुंडे आसाराम, मिस्त्री जितेन्द्रे, बडदे ललिता व निखिल कांबळे, कुणाल सोनवणे या सर्व शिक्षकांचे व कर्मचारी वर्गाचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
 # खराबवाडी येथील विज्ञान शाखेचा निकाल 97% लागला असुन आर्ट्स शाखेचा निकाल 76% लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 89% लागला आहे तर चिंबळी फाटा येथील इयत्ता 12 वी चा निकाल 85% लागलेला आहे.
# श्री समर्थ ज्युनियर कॉलेज खराबवाडी येथील यशस्वी विद्यार्थी:-
सायन्स-
  १) शेळके अनुष्का- 93.53%
  २) परमार केजल -82%
  ३)जरे समृद्धी  -79.53%
कॉमर्स –
  १) रणपिसे रोहिदास- 81.53%
  २)पंडित मुकेश  -78.30%
  ३)हानवते निकिता -76.30%
आर्टस् –
१)पाटील प्रदुमन- 90 %
२)मूलगीर चैतन्या- 79.53%
३)शिंदे सोनल- 71.53%
श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा येथील यशस्वी विद्यार्थी:-
आर्टस्-
१) काकडे राणी: 77.69%
२)निकिता गवारे : 65.23%
३) शुभम मुह्रे :55.23%
कॉमर्स-
 १)घाडगे ऋतुजा:   72:46%
२) तेजश्री जगताप : 68:61%
३)वैष्णवी बनकर:    67:84%
३) पुष्पराज मनवते : 67:84%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!