Sunday, August 31, 2025
Latest:
खेडजयंतीपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन न्यूज : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अनाथ मुलांना फळे वाटप

 

महाबुलेटीन न्यूज
शेलपिंपळगाव : येथील संपर्क बालग्राम मध्ये शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना शिवसेना पक्ष्याच्या वक्त्यांनी उजाळा दिला व अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. 

यावेळी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू नितीनशेठ गोरे, शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, शिवसेना सल्लागार प्रकाश वाडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, पंचायत समितीच्या उपसभापती ज्योतीताई आरगडे, युवानेते विजय शिंदे, उपतालुका प्रमुख केशवराव आरगडे, किरण गवारे, बाप्पूसाहेब थिटे, विभागप्रमूख देवराम वाडेकर, युवासेना उप तालुका प्रमुख विशाल पोतले, वाहतूक सेनेचे उपतालुका प्रमुख अमोल इंगळे, उपविभाग प्रमुख पंकज गायकवाड, राजगुरुनगर महिला आघाडी शहर प्रमुख अर्चनाताई सांडभोर, शेलपिंपळगावचे शाखा प्रमुख संदिप इंगळे, शेलपिंपळगाव सोसायटी संचालक रोहिदास दौंडकर, लक्ष्मण दौंडकर, सुभाषराव इंगळे, युवा नेते अजित घारे, सुयोग शेवकरी, अभिजीत लांडे, विद्यार्थी सेनेचे श्रीनाथ लांडे,।संपर्क बालग्रामचे गांगुली सर आदी उपस्थित होते.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!