सोशल मीडियावरील बळीराजाच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद… ● व्हायरल पोस्ट नंतर प्रथमच शिवसैनिकांनी कलिंगड कापून केला वाढदिवस साजरा…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : शेतकरी राजाच्या आव्हानाला व सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टला प्रतिसाद देत शिवसैनिकांनी चाकण शहर शिवसेनेचे उपविभाग प्रमुख स्वामी कानपिळे यांचा वाढदिवस कलिंगड कापुन साजरा केला.
यावेळी मा. ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गोरे, शिवसेना चाकण शहर उपविभाग प्रमुख शेखर नाना पिंगळे, अक्षय जाधव, राजेंद्र जाधव, आकाश पवार, सोमनाथ भुजबळ, सुनिल गुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते…