शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक कामकाजाकरीता तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष स्थापन : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि.13 : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिक्षक व पदवीधर सार्वत्रिक निवडणूक – 2020 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून निवडणूक कामकाजाकरीता पुणे येथे तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
विभाग स्तरावरील पाच जिल्हयासाठी तक्रार निवारण कक्ष व नियंत्रण कक्ष पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षामध्ये तक्रारींचे निरसन करण्यासाठी दोन दुरध्वनी बसविण्यात आलेले असून दूरध्वनी क्रमांक 020-26361050, 020-26362627 हे व punegtelection2020@gmail.com असा ईमेल आयडी आहे. तसेच पुणे जिल्ह्यासाठी तक्रार निवारण कक्ष व नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग, दुसरा मजला, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.17 यांचे कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षामध्ये तक्रारींचे निरसन करण्यासाठी तीन दुरध्वनी बसविण्यात आले असून दुरध्वनी क्रमांक 020-26137233, 020-26137234, 020-26137235 हे व tgelection2020@gmail.com असा ईमेल आयडी आहे.