गायिका कार्तिकी गायकवाड अडकणार लग्नाच्या बेडीत, २६ जुलैला होणार साखरपुडा
महाबुलेटिन नेटवर्क
आळंदी : झी मराठी वाहिनीवर सारेगमप – लिट्ल चॅम्प या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली व गायन क्षेत्रात अल्पावधीत नाव कमावलेली गायिका कार्तिकी कल्याणजी गायकवाड हिचा येत्या २६ जुलैला साखरपुडा होणार असून लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच कार्तिकीच्या निवासस्थानी गंधाचा कार्यक्रम झाला असून कोरोनाच्या साथीमुळे हा कार्यक्रम छोटेखानी झाला आहे. पुण्यातील रोनित पिसे या तरुणासोबत कार्तिकीचा साखरपुडा होणार आहे.
रोनित बरोबर लवकरच कार्तिकी विवाहबंधनात अडकणार आहे. रोनित पिसे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोनित उत्तम तबलावादक असून संगीताचीही आवड आहे.

