सारा सिटीत तरुणाची आत्महत्या
सारा सिटीत तरुणाची आत्महत्या
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील सारा सिटीत एका विवाहित तरुणाने राहत्या फ्लॅटच्या हॉल मधील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज ( दि. ३० मे ) रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी घडली. सुनील केशव चव्हाण ( वय २६, रा. सारा सिटी, खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. कोठा तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ सचिन केशव चव्हाण ( रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण ) यांनी म्हाळुंगे पोलीस चौकीत खबर दिली आहे. पोलीस पाटील किरण किर्ते यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत वहिल हे पुढील तपास करीत आहेत.