Thursday, April 17, 2025
Latest:
अपघातजुन्नरनिधन वार्तापुणे जिल्हाविशेषशैक्षणिक

सबनीस विद्यामंदिरातील शिक्षक संजय कोकणे यांचे कंटेनरच्या धडकेत अपघाती निधन

सबनीस विद्यामंदिरातील शिक्षक संजय कोकणे यांचे कंटेनरच्या धडकेत अपघाती निधन

महाबुलेटीन न्यूज 
नारायणगाव दि २० ( किरण वाजगे ) : नारायणगाव तालुका जुन्नर येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील शिक्षक संजय पांडुरंग कोकणे ( वय ४७ ) यांचे शुक्रवार दि १९ मार्च रोजी कंटेनरच्या धडकेत अपघाती निधन झाले.

त्यांच्यामागे वडील, भाऊ, पत्नी, तीन बहिणी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. काल दि. १९ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळील हॉटेल श्रीराज समोर संजय कोकणे हे स्कुटी ( क्रमांक एम. एच. १४ एफ.एस. ६५४३ ) वरून घरी जात होते. यावेळी पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जात असलेल्या कंटेनर ( क्रमांक एम. एच. ४६ बी.बी. ४६४१) ची धडक होऊन ते जागीच मृत्यूमुखी पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!