सांगूर्डीत धनगर वाड्यातील मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून आठ गाभण मेंढ्यांचा मृत्यू, सोळा मेंढ्या जखमी.. ● दोन लाखाचे नुकसान.. ● नुकसानभरपाईची मागणी
सांगूर्डीत धनगर वाड्यातील मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून आठ गाभण मेंढ्यांचा मृत्यू, सोळा मेंढ्या जखमी..
● दोन लाखाचे नुकसान..
● नुकसानभरपाईची मागणी
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण / देहूगाव : सांगुर्डी (ता. खेड) येथे आज झालेल्या विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात अमृता कर्हे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून आठ गाभण मेंढ्यांचा मृत्यू झाला असुन पंधरा ते सोळा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना आज ( दि. ३० मे ) रोजी सात वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे २ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
ही घटना कळताच सांगुर्डी गावच्या पोलीस पाटील सोनम ज्ञानेश्वर काळे, सरपंच वसंत भसे, कृष्णा भसे, नारायण मराठे, संतोष भोसले, सुदाम भसे, गोविंद भसे, गणेश भसे यांनी अमृता कर्हे यांच्या वाड्यावर जाऊन पाहणी केली व अमृता कर्हे यांना धीर दिला. सरपंच वसंत भसे यांनी संबंधित कर्हे यांच्या मृत मेंढ्यांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
००००