सामाजिक कार्यकर्त्या वसुंधरा महाजन यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वसुंधरा वसंतराव महाजन (वय ८२) यांचे बुधवारी (दि.११) वृद्धापकाळाने निधन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर बनेश्वर स्मशानभूमीत निवडक नातेवाईकांमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा महेश, मुलगी माधुरी, सून मीरा, नातवंडे असा परिवार आहे. फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक, उद्योजक महेश महाजन यांच्या त्या मातोश्री होत.