ऋतुजा गिलबिले हिची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड
ऋतुजा गिलबिले हिची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : ऋतुजा रवींद्र गिलबिले हिची नुकतीच महाराष्ट्र महिला सिनियर संघ रणजी क्रिकेट साठी निवड झाली आहे. उत्तराखंड येथे होणाऱ्या महिला क्रिकेट वन डे डोमेस्टिक स्पर्धेत ती महाराष्ट्र संघातून खेळणार आहे. यापूर्वी जयपूर, पाँडिचेरी या ठिकाणी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत ऋतुजा खेळली आहे. ही निवड झाल्याबद्दल आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते ऋतुजा हीचा सत्कार करण्यात आला.
खेड तालुक्यातील कोयाळी तर्फे वाडा ता. खेड या चासकमान धरण बुडीत क्षेत्रातील ऋतुजा रहिवासी असून सध्या ती मोशी येथे वास्तव्यास आहे. पुणे येथील क्रिकेट अकादमी मध्ये ती सराव करत आहे. तिच्या या यशात तिचे वडील रवींद्र गिलबिले यांचा मोठा वाटा आहे. खेळाची कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना क्रिकेटच्या आवडीतून त्यांनी ऋतुजा हिला मोठी संधी उपलब्ध करून दिली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून ऋतुजा व तिच्या पालकांचे कौतुक होत आहे.
राजगुरूनगर येथे सत्कार प्रसंगी माजी जि. प. सदस्य सुरेखाताई मोहिते, माजी सभापती अरुण चांभारे, राजगुरूनगर नगरपरिषदच्या मुख्याधिकारी निवेदिता घारगे, वाडा गावचे माजी सरपंच झाकीर तांबोळी, महात्मा गांधी विद्यालय क्रीडा शिक्षक नितीन वरकड, ऋतुजा हिचे वडील रवींद्र गिलबिले, सामाजिक कार्यकर्ते मधूकर गिलबिले गुरुजी आदी उपस्थित होते.
००००