महाबुलेटीन न्यूज : रिपाइंचे राज्य सचिव हरेशभाई देखणे यांचा केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्काराने गौरव..
महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : दिक्षा एज्युकेशन सोसायटी, नवी मुंबई यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा MTDC रेसिडेन्सी, खारघर येथे रविवारी दि.31 जानेवारी 2021 रोजी जीवनगौरव समाजरत्न पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना समाजरत्न, समाजभुषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय नेत्या सिमाताई आठवले, मा. राज्यमंत्री अविनाश महातेकर, मा. आमदार सुंमतराव गायकवाड, पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक, राजकीय़ क्षेत्रात उल्लेखनिय कार्य तसेच कोविड – 19 च्या कालावधीत लोकांसाठी अविरत कार्य केल्याबद्दल केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपाइं (आठवले ) या पक्षाचे प्रदेश सचिव हरेशभाई देखणे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संयोजन चंद्रकांत जगताप यांनी केले होते. हरेशभाई देखणे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याने विविध स्तरांतुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.