Sunday, August 31, 2025
Latest:
कोरोनाखेडविधायकविशेषसामाजिक

चाकण रोटरी क्लबच्या वतीने पोलीस व सफाई कामगारांना मास्क वाटप

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : शहरात सध्या कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या  रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस व सफाई कामगार हे आपली जबाबदारी अहोरात्र पार पाडत आहे. या पार्श्वभूमीवर चाकण रोटरी क्लबने चाकण पोलीस स्टेशनचा संपुर्ण स्टाफ व चाकण नगर परिषदेतील सफाई कामगार यांना रोटरीचे लोगो असलेले मास्क वाटप केले आहेत. या उपक्रमासाठी सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
यावेळी रोटरी क्लब चाकणचे अध्यक्ष दिपक करपे, सचिव सुभाष शिंदे, सदस्य सुधीर काकडे, भगवान घोडेकर, संभाजी सोनवणे, संतोष कापुरे, भाऊसाहेब धूमल, चंद्रकांत गोरे, शब्बीरभाई शिकलकर, मोहन परदेशी, पत्रकार संजय बोथरा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!