Saturday, August 30, 2025
Latest:
आंबेगावनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाविशेषशैक्षणिकसातारा

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी प्राचार्य डॉ. के. जी. कानडे

 

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
मंचर : येथील अण्णासाहेब आवटे काॅलेज मध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. के. जी. कानडे यांची सन २०२० ते २०२३ या कालावधीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

डॉ. कानडे हे दि. ६/८/२०२० पासून अण्णासाहेब आवटे काॅलेज, मंचर या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. यापूर्वी ते रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेज, पंढरपूर, छत्रपती शिवाजी काॅलेज, सातारा व महाराजा जिजाजीराव शिंदे काॅलेज, श्रीगोंदा या महाविद्यालयामध्ये सुरवातीचे २ वर्ष व यशवंतराव चव्हाण सायन्स् स्वायंत्त महाविद्यालय, सातारा येथे मागील ५ वर्ष त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे प्राचार्य पदाचा ७ वर्षाचा अनुभव होता. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण सायन्स स्वायंत्त महाविद्यालय, सातारा या महाविद्यालयाचे क्लस्टर विद्यापीठ करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.
प्राचार्य डाॅ. कानडे यांना अध्यापनाचा २५ वर्षाचा अनुभव आहे. ते रसायनशास्त्र या विषयाचे निष्णात प्राध्यापक असून २००८ ते २०१३ या कालावधीत त्यांनी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात विभागप्रमुख तसेच नॅक को-ऑडिनेटर म्हणून काम पाहिले आहे. प्राचार्य डाॅ. कानडे यांनी संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय जनर्ल्स मध्ये ७८ शोधनिंबध प्रसिध्द केले आहेत. त्यापैकी ४ शोधनिंबधाला विशेष पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी दक्षिण कोरीया येथे एक वर्ष रिसर्च फेलोशीप वर काम केले आहे. चीन, जपान, सिंगापुर, मलेशिया, यु. के. या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी पुर्ण केली असून २ विद्यार्थी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत संशोधन करत आहेत. त्यांच्या या यशस्वी वाटचाली वरून रयत शिक्षण संस्थेने त्यांची सन २०२०-२१ ते २०२२-२३ या कालावधीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झालेली आहे.

प्राचार्य डाॅ. कानडे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे मुळगाव जऊळके बुद्रुक पो. पारगाव तर्फे खेड, ता. खेड, जि. पुणे हे असून त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये ही सर्व वाटचाल केली आहे. संशोधन व व्यवस्थापन यामध्ये त्यांचे विशेष कौशल्य दिसुन येते. त्यांचा या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा महाविद्यालयाला निश्चितच चांगला फायदा होईल.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!