रयत शिक्षण संस्थेच्या कला शिक्षकाने लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाबरोबरच आदिवासी पट्ट्यात गिरवले भातशेतीचे धडे…
रयत शिक्षण संस्थेच्या कला शिक्षकाने लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाबरोबरच आदिवासी पट्ट्यात गिरवले भातशेतीचे धडे…
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
भंडारदरा : भंडारदरा ता. अकोले जि. नगर येथील कला शिक्षक दशरथ नवसु खाडे यांनी लॉक-डाऊन काळात ४७ वर्षातुन पहिल्यांदाच केली भातशेतीची कामे…. भातपिकाचे मिळणार चांगले उत्पन्न….
प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, काॅलेजचे शिक्षण, नोकरी या निमित्ताने खाडे सर पहिल्यापासुनच बाहेरगावी असल्याने शेती करण्याची संधी त्यांना लॉकडाऊन मुळे आपल्या मूळगावी गेले व कुटुंबातील वडील नवसु खाडे, आई अनुसया खाडे, पत्नी संगिता खाडे यांच्याबरोबर पहिल्यांदाच शेतीकाम करण्याची संधी मिळाली.
गेल्या काही महिन्यांपासुन कोरोनाने थैमान घातले असुन दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्न वाढतच आहेत. या काळात रयत शिक्षण संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील एका शाळेत कार्यरत असलेले कलाशिक्षक सध्या घरीच आहेत. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबरोबरच शेतातील भातपिकाची कामेही ते करत आहेत.
विद्यार्थ्यांना लाॅकडाऊन काळात अभ्यासाचा चांगला फायदा व्हावा या उद्देशाने संस्थेने ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केला असुन तो अभ्यासक्रम मुख्याध्यापकांमार्फत शिक्षकांना दिला जातो. शिक्षक तो अभ्यास विद्यार्थ्यांना व्हाॅटसअप ग्रुपवर दररोज पाठवतात. त्यावरुन विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत आहेत. विद्यार्थी देखील या अभ्यासक्रमात सहभागी होत आहेत.
लॉकडाऊन असल्याने पुणे जिल्ह्यात नोकरीस असलेले शिक्षक दशरथ खाडे हे पहिल्यांदाच आपल्या शेतात काम करत आहेत. भाताचे रोपं भाजणीपासुन ते भातकापणी, झोडणी पर्यंतची सर्व कामे ते पहिल्यांदाच करत आहेत.
परतीच्या पावसाने काही प्रमाणात भात पिकाचे नुकसान झाले असले तरी काही भातपिक चांगले आले असुन आपल्या शेतातून चांगले उत्पन्न नक्कीच मिळेल, अशी त्यांना आशा आहे.