रत्नप्रभा कुऱ्हाडे पाटील यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी देवाची : येथील रत्नप्रभा बबनराव कुऱ्हाडे पा. (वय वर्षे ६०) यांचे अल्पशा आजाराने दि. ११ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
खेड तालुक्याचे ज्येष्ठ नेते आळंदी नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पा. यांच्या त्या पत्नी, आळंदी नगरपरिषदेच्या नगरसेविका स्नेहल कुर्हाडे यांच्या त्या सासु, तर उद्योगपती सतीषशेठ कुर्हाडे यांच्या मातोश्री होत.