Sunday, August 31, 2025
Latest:
नासिकराजकीयविशेष

राष्ट्रवादीच्या संपर्क अभियानास बागलाण तालुक्यात प्रचंड प्रतिसाद, ● सर्वदूर पाठिंब्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

 

महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
नासिक : नासिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पक्षबांधणी आणि संपर्क मोहीम हाती घेतली आहे. बागलाण तालुक्यात या राष्ट्रवादीच्या मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळताना पहाण्यास मिळाला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नासिक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार यांच्या पुढाकाराने आणि जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र नाना पगार यांच्या मार्गदर्शनाखाली, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ कडलग, पक्ष निरीक्षक सुनील गोटु, आबा आहेर यांच्या सुचनेनुसार बागलाण तालुक्यातील पक्ष संघटन वाढीबाबत आणि संपर्क अभियानाबाबत सुरुवात करण्यात आली. 

अंतापुर, मुल्हेर, देवठाण, शेवरे, माळीवाडे, जैतापूर, बोराटे, मोहांगी, हतनुर या गावांमध्ये जो दौरा गणेश पवार यांनी केला, त्या दौऱ्याचा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसची वाढू लागलेली ताकद दाखवत होता. ‘एकच वादा गणेशदादा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मंत्री छगन भुजबळ’ यांच्या नावाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. तरुण, बुजुर्ग आणि महिला यांचा या दौऱ्यास आणि संपर्क अभियानास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.

युवकांना जोडणीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न, पक्षाची ध्येयधोरणे मुद्देसुद यावेळी मांडण्यात आली. आगामी निवडणूक काळात जास्तीत जास्त युवकांना संधी दिली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. संदीप आबा साळवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटना वाढविण्यासाठी आवाहन केले. सुनील भामरे, समाधान भामरे, पकंज खैरनार यांनी येणाऱ्या काळातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

दौऱ्यावेळी ग्रामपंचायत अंतापुर येथे मा. सरपंच सुनील गवळी, मदन खैरनार, प्रमोद खैरनार, प्रकाश गवळी, कारभारी नंदन व ग्रामस्थ उपस्थित होते.

युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार, समता परिषद तालुका उपाध्यक्ष संदीप भाऊ साळवे, ज्ञानेश नंदन, सुनील भामरे, राकेश पवार, समाधान भामरे, अंतापूर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सुनील भाऊ गवळी, कारभारी नंदन, सुनील नंदन, जीवन गवांदे उपस्थित होते.

■ या दौऱ्याची ठळक वैशिट्य…..
● तरुणांबरोबर बुजूर्गांचाही प्रतिसाद
● महिलांचाही प्रतिसाद
● राष्ट्रवादीची वाढत्या ताकदीचा आला अंदाज
● पक्ष बांधनिस पदाधिकारी सक्रिय
● विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!