रक्ताने लिहिले पत्र….
धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन
महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर इंदापूर तालुका धनगर ऐक्य अभियानाच्या वतीने धनगर आरक्षणासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेेेेधण्यासाठी प्रशासकीय भवनासमोर आंदोलन केले. सरकारने मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा धनगर समाजाच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदार सोनाली मेटकरी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्यात यावा. शासनाने घोषित केलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. मेंढपाळांवरचे हल्ले थांबवावेत या प्रमुख मागण्या रक्ताने पत्र लिहून सादर करण्यात आल्या.
धनगर ऐक्य अभियानाचे प्रमुख डॉ. शशिकांत तरंगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे, ज्ञानदेव डोंबाळे, तेजस देवकाते, दत्तात्रय पांढरे, नानासाहेब खरात, धनाजी देवकाते, पोपट पवार, महादेव पांढरे, संपत सरक, सचिन खामगळ, बापू पारेकर, तानाजी मारकड, धनाजी देवकाते, प्रवीण हरणावळ यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
——–

