राज्याचा बारावीचा निकाल ९० .६६ टक्के, निकालात मुलींनी मारली बाजी, कोकण विभाग अव्वल
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.
राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे.

कोरोनामुळे इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर सर्व अडचणींवर मात करून गुरुवारी राज्य मंडळाने निकाल जाहीर केला.
————
# राज्यातील विभागीय मंडळ निहाय निकाल
पुणे : ९२.५० टक्के, नागपूर : ९१.६५ टक्के, औरंगाबाद : ८८.१८ टक्के, मुंबई : ८९.३५ टक्के, कोल्हापूर : ९२.४२ टक्के, अमरावती : ९२.०९ टक्के, नाशिक : ८८.८७ टक्के, लातूर : ८९.७९ टक्के, कोकण : ९५.८९ टक्के
—————–
# शाखानिहाय निकाल
कला – ८२.६३
वाणिज्य – ९१.२७
विज्ञान – ९६.९३
व्यवसायिक अभ्यासक्रम- ८६.०७
# खालील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल