….त्या राष्ट्रीय नेत्या, त्यांच्याबद्दल मी काय बोलू !
….त्या राष्ट्रीय नेत्या, त्यांच्याबद्दल मी काय बोलू !
महाबुलेटिन नेटवर्क। शिवाजी आतकरी
शरद पवार हे एक चालते बोलते राजकीय विद्यापीठ. प्रदीर्घ अनुभव असणारा हा नेता म्हणजे राजकीय दीपस्तंभ. राज्यातील प्रत्येक घटनेमागे जणू शरद पवारांचा हात आहे, असे म्हणण्याची जणू आता सवय झालीय उभ्या महाराष्ट्राला. म्हणूनच पवारांचा हात असल्याशिवाय महाराष्ट्रातील कोणतीही गोष्ट पूर्ण होऊच शकत नाही. इतका हा माणूस मोठा. त्यामुळे या राजकीय विद्यापीठातून वैशिष्टयपूर्ण विद्यार्थी घडले. ना. दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, स्व आर आर पाटील अशी मोठी श्रेयनामावली आहे.
शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांचे आयुष्य विविध घटना, किस्से यांनी भरून उरले आहे. एक असाच किस्सा पूर्वी घडला होता. काँग्रेस मधून फुटून पवार साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढला होता. तत्कालीन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा राव सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत असत. ही टीका सतत माध्यमांमधून प्रसिद्ध होत होती. असे बराच काळ चालले होते. एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पवारसाहेबांना प्रश्न केला की, सन्माननीय प्रभा राव आपल्यावर सातत्याने टीका करीत आहेत;मात्र आपण प्रत्युत्तर न करता गप्प कसे? मुरब्बी शरद पवार यांनी त्यावेळी अशी काही गुगली टाकली की तो पत्रकार तर त्रिफळाचीत झालाच,वशिवाय प्रभा राव यांचीही विकेट काढताना विरोधकांना टिकेबाबत विचार करायला भाग पाडले. पवार साहेबांनी हा संपूर्ण विषय एका वाक्यात निकालात काढला. ते वाक्य होते, “प्रभा राव या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्याने बोलणे योग्य नाही.” पुढे टीका कमी झाली वगैरे ओघाने आलेच. यातून पवारसाहेबांचे काही पैलू समोर आले. टीकेला महत्व न देणे, अनुल्लेखाने मारणे वगैरे….हा किस्साही त्यावेळी चांगलाच गाजला होता.