राजगुरूनगर आगाराच्या लाल परीच्या फेऱ्या सुरू…
राजगुरूनगर आगाराच्या लाल परीच्या फेऱ्या सुरू..
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ राजगुरुनगर आगार मार्फत ग्रामीण भागातील एस. टी. बसच्या फेऱ्यांबरोबरच लांब व मध्यम पल्ला असणाऱ्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या असून; सर्व प्रवासी बांधवांनी राज्य परिवहन मंडळाच्या लाल परीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजगुरुनगर बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक रमेश गांधी यांनी केले आहे.
मार्ग गाडी सुटण्याची वेळ गाडी परतीची वेळ
राजगुरुनगर ते मुंबई सेंट्रल ०९. ३० १६.००
राजगुरुनगर ते वर्सोवा अंधेरी १६.०० ०७.००
भीमाशंकर ते कुर्ला नेहरूनगर १२. ०० ०६.३०
भोरगिरी ते बोरवली ११.१५ ०७.००
घोटवडी ते बोरिवली १०.०० ०६.३०
राजगुरुनगर ते पुणे-औरंगाबाद ०६. १५ १३.४५
राजगुरुनगर ते पुणे – औरंगाबाद १३. ३० ०६.३०
राजगुरुनगर ते पुणे – औरंगाबाद १५.०० ०७.००
राजगुरुनगर ते पुणे – पैठण ०७.१५ १४.३०
राजगुरुनगर ते पुणे – बार्शी ०६.३० १३.३०
राजगुरुनगर ते आळंदी – पंढरपूर ०७.०० १५.३०
राजगुरुनगर ते पुणे – मिरज ०५.१५ १५.००
घोडेगाव ते मुंबई सेंट्रल १२.३० ०६.४५
या एस. टी. बसेसचे जाण्याचे व येण्याचे वेळापत्रक आहे.
दिवाळी सणासाठी दिनांक ८/११/२०२० पासून ———————–
मार्ग गाडी सुटण्याची वेळ गाडी परतीची वेळ
राजगुरुनगर ते पुणे-बार्शी ०६.३० १३.३०
राजगुरुनगर ते पुणे – धुळे १०.४५ ०६.३०
राजगुरुनगर ते पुणे – पैठण ०६.०० १३.००
या सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.
वरील वेळापत्रकानुसार सर्व फेऱ्या ऑनलाईन बुकिंग साठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून; सर्व सवलतधारक प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे.