राजगुरूनगर येथे दत्तजयंती उत्साहात साजरी
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर, (दि. ३०) : ” दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” असा अखंड जयघोष करत राजगुरूनगर येथील भीमा नदीतीरावर दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच कोरोनाच्या संकटातून मुक्ती साठी प्रार्थना ही करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राजगुरुनगर शहर परिसरात दत्तजयंतीचा सोहळा पारंपारिक धार्मिक कार्यक्रमांनी व साधेपणाने साजरा करण्यात आला.
दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. २९) रोजी सकाळी ७ वाजता ‘श्रीं’ च्या मूर्तीस समीर प्रताप आहेर या उभयतांच्या हस्ते अभिषेक करुन महापूजा करण्यात आली. दुपारी श्रीदत्त विश्वस्त भजनी मंडळाचे भजन होऊन सायंकाळी सहा वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात दत्त प्रतिमा ठेऊन भक्तिमय वातावरणात ह.भ.प. विठ्ठल महाराज गुंडाळ यांचे दत्त जन्मावर प्रवचन होऊन जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी महिलांकडून पारंपरिक पाळणा गीते व आरत्या म्हणण्यात आल्या. जन्मकाळानंतर भाविकांना
सुंठवडा, खिचडी व केळी यांचा प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, माजी अध्यक्ष प्रतापराव आहेर, उद्योगपती अविनाश नाणेकर, सुभाष होले, माणिक भांबुरे, माणिक सांडभोर, विजया शिंदे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यंदा प्रथमच पालखीसेवा व ग्राम प्रदक्षिणेचा सोहळा रद्द करण्यात आला. रात्रौ मंत्रजप आणि भजनाच्या कार्यक्रम संपन्न झाला.
आज बुधवार (दि. ३०) रोजी सामुदायिक मंत्र जप होऊन विशाल घुमटकर यांचे हस्ते महाप्रसादाचे वाटप होऊन उत्सवाची सांगता करण्यात आली.
उत्सवाचे संयोजन अध्यक्ष प्रताप आहेर, कार्याध्यक्ष रविंद्र जोशी, उपाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, खजिनदार हनुमंत सैद, प्रकाश तेंडोलकर, पत्रकार प्रभाकर जाधव, पांडुरंग साळुंके, अशोक चव्हाण, नथुराम तनपुरे, रविंद्र सांडभोर, माणिक तनपुरे, अजित डोळस, नारायण जाधव, समीर आहेर, बाबा साळुंके, ऍड. गणेश होनराव, मंदार पिसाळ, शरद चोपडे, कमल पिसाळ, कुसुम तनपुरे, जनाबाई सैद, जयश्री आंबडेकर, सुनंदा दहितुले, आदी गुरू बंधूं- भगिनिंनी केल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रताप आहेर यांनी सांगितले.