Saturday, August 30, 2025
Latest:
कोरोनापुणे शहर विभागविशेषशैक्षणिक

पुण्यात रात्रीची संचारबंदी वाढवली… शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लास बंद

 

महाबुलेटीन न्यूज
पुणे : दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तसंच, रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यातील रात्रीची संचारबंदी १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लास बंद राहणार आहेत. 

पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्यानं खबदारी म्हणून  महाविद्यालये आणि कोचिंग क्लास १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात ऑनलाइन शिक्षणास परवानगी असेल.

रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचार निर्बंध कायम असणार आहेत. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर, अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे, असंही महापौरांनी सांगितलं. 
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!