पुण्यात भीषण अपघात; भरधाव ट्रकने १३ वाहनांना उडविले एक ठार, सहा गंभीर जखमी
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज बाह्य वळण मार्गावर बाबाजी पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या ट्रकने पाच चार चाकी व आठ दुचाकी अशा तेरा वाहनांना पाठीमागून उडविले असून त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भरधाव ट्रक हा कात्रजकडून नवले ब्रीजकडे निघाला होता. पेट्रोल पंपाच्या उतारावर ट्रकचा पुढील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, सिंहगड पोलिस व वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून, जखमींना रुग्णालयात हलवले आहे. अपघात एवढा भिषण आहे की, त्यामध्ये अनेक दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या आहेत. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. क्रेसच्या सहाय्याने वाहने बाजूला काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.