Saturday, January 24, 2026
Latest:
निधन वार्तापुणे शहर विभागविशेष

पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे कोरोनामुळे निधन

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद एकबोटे ( वय ८४) यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

एकबोटे हे समाजवादी विचारसरणीचे व्यक्तिमत्व होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. गोल्फ क्लब आणि विडी कामगारांसाठी त्यांनी खराडी परिसरात घरे उभारली आहेत. त्यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत.

महाराणा प्रताप उद्यानात त्यांनी एस. एम. जोशी यांचा प्रणाकृती पुतळा उभारला होता. यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू असा परिवार आहे. गरिबांचे नेते म्हणून त्यांची पुणेकरांना ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!