पुणे एन डी आर एफ बटालियन 5 मध्ये श्री गणेशाचे भव्य मंदिर उभारणी… ● मंदिरात 12 फुटी गणेश मूर्ती व शिवलिंग प्रतिष्ठापना उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न
पुणे एन डी आर एफ बटालियन 5 मध्ये श्री गणेशाचे भव्य मंदिर उभारणी…
● मंदिरात 12 फुटी गणेश मूर्ती व शिवलिंग प्रतिष्ठापना उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
सुदुंबरे ( पुणे ) : येथील एन डी आर एफ बटालियन 5 मध्ये श्री गणेशाचे भव्य मंदिर बांधण्यात आले असून मंदिरात भव्य अशी 12 फूट श्री गणेशाची मूर्ती व शिवलिंगाची प्रतिष्ठापना अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. हे मंदिर 2 हजार स्क्वेअर फुटाचे असून या ‘सर्व-धर्म प्रार्थना स्थळा’चे उदघाटन बटालियन 5 चे कमांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेप्युटी कमांडंट पवन देव गौड, डेप्युटी कमांडंट दीपक तिवारी, महिला लैंगिक शोषण तक्रार समितीच्या सदस्या मंगलताई देवकर, पत्रकार हनुमंत देवकर तसेच बटालियनमधील सर्व जवान, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बटालियनमधील जवानांनी मंदिरात आकर्षक डेकोरेशन करून पुष्प सजावट केली होती. यावेळी मंदिरात भजन, होमहवन, श्री ची पूजा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काशीचे पुरोहित डॉ. प्रवीण जोशी यांनी पूजापाठ, होमहवन करून कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांच्या हस्ते सपत्नीक श्रीची प्राणप्रतिष्ठापना केली.
००००