पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमध्ये युवक-युवतींना नोकरीची सुवर्णसंधी…
ऑनलाईन / ऑफलाईन होणार मुलाखती…
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजन
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 8 सप्टेंबर : पुणे जिल्हयातील विविध नामांकित कंपन्यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी व 12 वी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल तसेच बी.ई- मॅकेनिकल, प्रॉडक्शन या शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदासह सहभागी होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे या कार्यालयाच्या वतीने दिनांक 28 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत यावर्षीच्या 4 थ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
# कसा घ्यावा रोजगार मेळाव्यात सहभाग :-
—————
हा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छुक युवक-युवतींनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. होम पेजवरील नोकरी साधक ( job Seeker) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील PANDIT DINDAYAL UPADHAYAY ONLINE JOB FAIR – 4 या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजक निहाय त्यांच्याकडील रिक्तपदाची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेवून, उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.
इच्छुक युवक युवतींनी दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार संधीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
Pune
Good
The Great